न्यायालयात वकिलांना फार मोठी भूमिका बजावावी लागते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |


वरिष्ठ अधिवक्ता दिलीप परांजपे यांचे प्रतिपादनः अ‍ॅड.के.बी.वर्मा लिखीत पुस्तकांचे प्रकाशन

 
 
 
जळगाव : 
 
न्यायालयात पती-पत्नीच्या वादात युक्तिवाद करताना वकिलांना दोन्ही बाजूने फार मोठी भूमिका बजावावी लागते. न्यायालयात आज अनेक प्रकरणे प्रलंबित असून न्यायाधीश कमी आहेत,
 
 
त्यामुळे वाद मिटविण्यात पती-पत्नीचे भले होत असते. वकिलांना ती भूमिका पार पाडावी लागते असे सांगून जिल्ह्यात गार्डियन्स फाउंंडेशनचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ अधिवक्ता दिलीप परांजपे यांनी केले.
 
 
अ‍ॅड. के. बी. वर्मा लिखीत ‘पती पत्नीचे वाद व कायदे अर्ज-तक्रारींचे नमुने’ या पुस्तकाचे आणि ‘फिर्याद व अर्जांचे नमुने’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुरूमाऊली प्रतिभा अत्रे, प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड.सुशील अत्रे, जैन उद्योग समुहाचे अशोक जैन उपस्थित होते.
 
 
नटवर कंपाऊंडमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरूवातीला अ‍ॅड.के.बी.वर्मा अ‍ॅन्ड असोसिएटस् या लॉ फर्मचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केल्यानंतर बोलताना अ‍ॅड.सुशील अत्रे यांनी पुस्तक लिहायला आणि प्रकाशित करायला खूप काही करावे लागते. के.बी.वर्मा यांना कधीही आळस वाटत नसल्याने त्यांनी पुस्तक लेखन केल्याचे सांगितले.
 
 
गुरूमाऊली प्रतिभा अत्रे यांनी नवरा - बायकोचे वाद नवीन नसून फार पूर्वीपासून चालत आले आहे. परंतु सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. ते रोखणे प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
 
 
जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले की, शहरात लॉ फर्म एक चांगली संकल्पना आहे. काम करताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. पती-पत्नीमध्ये वाद होवू नये यासाठी माझे वडील भंवरलाल जैन यांनी लिहिलेले ‘ती आणि मी’ पुस्तक वाचावे असे आवाहन त्यांनी केले.
 
 
अ‍ॅड.के.बी.वर्मा यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहे असेही सांगितले. प्रास्ताविकात अ‍ॅड.के.बी.वर्मा यांनी पुस्तकांची माहिती दिली. सूत्रसंचालन स्वरूप लुंकड यांनी तर आभार निलेश जैन यांनी मानले.
गार्डियन्स फाउंंडेशनसाठी दरवर्षी 1 लाखांची मदत
 
 
जिल्ह्यातील गरजू मुलांच्या उच्चशिक्षणासाठी मदत करणार्‍या गार्डियन्स फाऊंडेशनचे कौतुक करून दरवर्षी 1 लाखांची आर्थिक मदत करण्याची घोषणा अशोक जैन यांनी यावेळी केली. यावेळी गार्डियन्स भाग्यश्री महाजन व खुशी वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अनिल देसर्डा व सत्यनारायण खटोड यांच्याकडून गार्डियन्स काजल खैरनार या विद्यार्थिनीला लॅपटॉप भेट देण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@