नवापूरच्या ज्योत्स्ना बोरसे यांचेे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

नवापूर :
 
अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षांच्या निकालात लग्नानंतर संसार सांभाळत नाशिक येथील नामांकित गोखले एज्युकेशन संस्थेच्या कॉलेजमधून इंजि. ज्योत्स्ना विशालराव बोरसे एम.ई. कॉम्प्युटरमध्ये 9.8 रँक घेत सर्वप्रथम आल्या.
 
 
त्यांचा नवापूर येथे माहेरच्यांकडून जगदाळे-बागुल लग्न समारंभात नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी इंजि.बबनराव जगदाळे म्हणाले की, लग्न झाल्यावरही आपली दृढ इच्छाशक्ती आणि सासर -माहेरचे पाठबळ असल्यास संसार सांभाळूनही यशाला गवसणी घालू शकतो.
 
 
शिकलेली मुलगी दोन्ही घरी ज्ञानाचा प्रकाश देईल. गुजरात कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष गजानंद खानझोडे यांनीही त्यांचे अभिनंदन करुन मुला-मुलींनी इंजि.ज्योत्स्नाचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.
 
 
त्या केंद्रप्रमुख भास्करराव बोरसे व सरला बोरसे ह्यांच्या स्नुषा, इमर्सन कंपनीचे प्रोजेक्ट इंजिनियर विशालराव बोरसे यांच्या पत्नी आहेत. नवापूरचे समाजभूषण दांपत्य संगीता आणि इंजि.बबनराव जगदाळे ह्यांच्या सुकन्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@