आदिवासी कोळी समाजाच्या मेळाव्यात 128 विवाहेच्छूकांनी दिला परिचय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
येथील श्री माता मनुदेवी संस्था संचालित आदिवासी कोळी समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात 128 विवाहेच्छूकांनी आपला परिचय करुन दिला.
 
 
सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन आमदार तथा कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
 
महर्षी वाल्मिकी प्रतिमा पूजन आयोजक मुकेश सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले. दीपप्रज्ज्वलन बी.टी.बाविस्कर, पंढरीनाथ वाघ, कैलास तायडे, अनिल सोनवणे, भगवान कोळी, बाळासाहेब सैंदाणे यांच्याहस्ते करण्यात आले.
 
 
अध्यक्षस्थानी माजी आ.रमेश पाटील (विधान परिषद सदस्य, मुंबई) होते. यावेळी शहराचे आ. सुरेश भोळे, डॉ. शांताराम सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, न.पा.चे माजी मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, नंदुरबारचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, कैलास तायडे, डॉ.दिवाकर पाटील, भास्कर पाटील, कैलास बाविस्कर, आत्माराम जाधव, संतोष सोनवणे, सरपंच सरस्वती सोनवणे, पं.स.भुसावळच्या उपसभापती वंदना उन्हाळे, हेमलता बागुल, निकिता सोनवणे, सुपडू पहेलवान, रवींद्र कांडेलकर, रामचंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
मेळाव्यात 97 युवती तसेच 31 युवक अशा एकूण 128 विवाहेच्छूकांनी परिचय करुन दिला. दरम्यान, 557 वधू-वरांची नोंदणी करण्यात आली. मेळाव्यात चर्चेअंती आठ जणांचे विवाह जुळले. आणखीही काही काही विवाह जुळण्याची शक्यता असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
 
 
याप्रसंगी आ.रमेश पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन रतन थोरात तर आभार वासुदेव सोनवणे यांनी मानले.
 
 
यशस्वीतेसाठी सुभाष सोनवणे, गोपाल सपकाळे, बाबुराव सपकाळे, कडू कोळी, वासुदेव सोनवणे, सुनय कोळी, संतोष सोनवणे, चंद्रशेखर साळुंखे, दत्तू कोळी आदींनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@