नासाच्या कॅलेंडरमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची चित्रे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
अमेरिका : नासाच्या नवीन वर्षाच्या म्हणजेच २०१९ च्या कॅलेंडरमध्ये जगभरातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. नासाच्या या कॅलेंडरमध्ये चार भारतीय विद्यार्थांनी काढलेल्या चित्रांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे नासाच्या कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर असलेले चित्र हे भारतातील उतत्र प्रदेशमधील दीपशिखा या विद्यार्थीनीने रेखाटले आहे.
 

दरवर्षीप्रमाणे यंदाही नासाने बारा महिन्यांचे एक थीम कॅलेंडर काढले. यावर्षी नासाने या कॅलेंडरसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. अंतराळ विद्यान अशी यंदाच्या कॅलेंडरसाठीची थीम होती. अंतराळवीराला पृथ्वीवरून हात दाखविणाऱ्या एका लहान मुलीचे चित्र दिपशिखाने रेखाटले होते. या चित्राची निवड कॅलेंडरच्या मुखपृष्ठासाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील इंद्रयुद्ध आणि श्रीहन या दोघांनी मिळून काढलेल्या चित्राचा समावेशही या कॅलेंडरमध्ये करण्यात आला आहे. अंतराळवीराचे आयुष्य आणि कार्य कसे असते, या आशयाचे चित्र त्यांनी काढले आहे. तामिळनाडूमधील थेमूकिलीमनने काढलेल्या स्पेस फूडच्या चित्राचा समावेशही या कॅलेंडरमध्ये करण्यात आला आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@