घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर; जीएसटी होणार कमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अंतर्गत जीएसटी परिषदेने शनिवारी तब्बल २३ वस्तूंवरील कर कमी केला आहे. मात्र, आता घर खरेदी करणाऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्याने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता १२ टक्के जीएसटी लागू होतो. हा जीएसटी कमी करण्याचा विचार सरकार करत आहेत. सध्या बांधकाम सुरू असलेल्या आणि भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या सदनिकांवरील जीएसटी दर कमी करण्याच विचार केंद्र सरकार करत आहे.

 

नवा दर ५ टक्के असेल, अशी शक्यता व्यक्त केली दात आहे. मात्र, भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी सध्या १२ टक्के आहे. 'विक्रीवेळी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या फ्लॅटवर जीएसटी लागत नाही. अशा प्रकरणांमध्ये विकासकांनी इमारतीच्या बांधकामावेळी विविध वस्तूंवर कर दिला असल्याने कराचा भार हलका होतो.

 

निर्माणाधीन इमारतींमध्ये जीएसटी दर कमी असायला हवा. मात्र, उत्पादन साहित्य खरेदी करताना दिलेल्या कराचा फायदा विकासकांकडून ग्राहकांना दिला जात नसल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान इमारत बांधणीसाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांश साहित्यावर १८ टक्के जीएसटी लागतो. तर सिमेंटवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@