फैजपूरला आढळला दुर्मीळ सरडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

 
फैजपूर :
 
येथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. नितीन चौधरी यांना उसमळी पाडा येथील जंगलात दुर्मीळ वनस्पती, वृक्ष आणि प्राणीजीवन अभ्यासताना महाराष्ट्रात क्वचित पाहायला मिळणारा सरडा आढळला.
 
 
याबाबत माहिती देतांना प्रा.चौधरी यांनी या सरड्याच्या पेशीविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, हा सरडा निसर्गाचा अप्रतिम अविष्कार असून असे दुर्मीळ जीवजंतूंच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे.
 
 
आजकाल टीव्ही आणि मोबाईलमुळे आपला निसर्गाशी संवाद होत नाही. निसर्ग मानवाच्या दुःखांना नष्ट करून जीवनात आनंद निर्माण करतो.
 
 
या शोधाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. शिरीष चौधरी, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. ए. कुमावत, प्रा.डी.आर.तायडे, प्रा. डॉ.जयश्री पाटील, प्रा.डॉ. सरला तडवी, प्रा.शिवाजी मगर यांनी प्रा.डॉ. नितीन चौधरी यांचे अभिनंदन
केले.
@@AUTHORINFO_V1@@