दीपनगर सीएसआर निधीच्या यादीतून वरणगावला जाणीवपूर्वक वगळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

ना. गिरीश महाजन यांच्याकडे नगराध्यक्ष सुनील काळे यांची तक्रार

वरणगाव : 
 
नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर 2015-2016 ह्या वर्षांत वरणगाव शहरात दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती कंपनीने मकरंदनगर भागात रस्ते व बसस्टँड चौकात लाईट लावले होते.
 
मात्र आता सीएसआरच्या 25 कोटीच्या निधी वाटपात वरणगाव शहराला जाणीवपूर्वक दबावाखाली वगळले आहे. हा अन्याय खपवून घेतला जाणार नसून सीएसआर निधीच्या यादीत वरणगाव शहराचे नाव घेऊन निधी देण्यात यावा अशा तक्रारींचे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांना नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिले.
 
 
त्यात वरणगाव शहराची लोकसंख्या 50 हजार आहे. वरणगाव शहर हे पश्चिमेला आहे.पश्चिम दिशेकडून हवेद्वारे संपूर्ण दीपनगरचे प्रदूषण वरणगावने सहन करायचे का? आणि त्यावर उपाययोजनेसाठी एक दमडी द्यायची नाही.
 
परत दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठी लागणार्‍या पाण्यासाठीची पाईपलाईन ही नियमबाह्य पद्धतीने भोगावती नदीपात्रात झिकझाक पद्धतीने टाकल्याने संपूर्ण गावाचे सांडपाणी त्या पाईपलाईनमुळे अडकते. हा मोठा धोका संपूर्ण गावाला निर्माण झाला आहे.
 
 
रोगराई आम्ही सहन करायची आणि सीएसआर निधी वाटप करतांना वरणगाव शहराला कुणाच्या सांगण्यावरून वगळून टाकायचे? असा अन्याय सहन करणार नाही. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आदींकडे रवाना केल्या आहेत, असेही सुनिल काळे यांनी त्यात शेवटी म्हटले
आहे.
@@AUTHORINFO_V1@@