स्पार्टन क्रिकेट संघाला सीएम चषक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

जामनेर तालुक्यातील 78 संघ सहभागी

 

 
 
जामनेर : 
 
गेल्या महिन्याभरापासून सिएमचषकअंतर्गत सुरु असलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धामधे स्पार्टन ए संघ अंतीम विजयाचा मानकरी ठरला.
 
शहरातील पांडुरंग-गाोवींद महाराज संस्थेच्या मैदानावरील स्पर्धेत एकूण 78 संघांनी आपला सहभाग नोंदविल्याने चुरस निर्माण झाली होती. यास्पर्धेत स्पार्टन बी द्वितीय, ईव्हिनींग ए तृतीय तर अंजुमन लायनला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 
 
स्पर्धा यशस्वीतेसाठी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, सुहास पाटील,योगेश मोते, चंद्रकांत बावीस्कर,गणेश माळी, रूपेश बावीस्कर, भुषण वाघ आदींनी सहकार्य केले. अंतीम विजयाचा मानकरी ठरलेला संघ आता जिल्हास्तरावर खेळणार आहे.
 
 
अंतीम विजयी ठरलेल्या स्पार्टन ए संघाचा सत्कार नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नपा गटनेते डॉ.प्रशांत भोंडे आदी होते.
@@AUTHORINFO_V1@@