तिसऱ्या कसोटीमध्ये दिसणार 'हा' खास खेळाडू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |



मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात २६ डिसेंबरपासून निर्णायक कसोटी सामना सुरू होत आहे. सामन्याआधी दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. भारताने हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांना संघात स्थान दिले आहे. तर, ऑस्ट्रेलियाने फक्त ७ वर्षीय खेळाडूचा संघात समावेश केला आहे. आर्ची सिचिलर असे या खेळाडूचे नाव आहे. तो कर्णधार टिम पेनसोबत संघाचे उपकर्णधारपद सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने आर्चीच्या वाढदिवसादिवशीच ही घोषणा केली आहे.

 

मेक अ विश अभियान अंतर्गत ऑस्ट्रेलिया संघात आर्चीच्या समावेश केला गेला आहे. या अभियानानुसार लहान मुलांना त्यांच्या विश पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे. जे लहान मुले कठीण परिस्थितीतून जात आहेत, त्यांची इच्छा पूर्ण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

 

कोण आहे हा आर्ची सिचिलर?

 

आर्ची सिचिलर क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. तो अवघ्या ३ महिन्याच्या असल्यापासून तो हृदय रोगाच्या समस्येने ग्रस्त आहे. अॅडलेड येथे राहणाऱ्या आर्चीवर आतापर्यंत १३ वेळा सर्जरी झाली आहे. यामध्ये एका ओपन हार्ट सर्जरीचा देखील समावेश आहे. यातील पहिली सर्जरी तो अवघ्या ३ महिन्याचा असताना झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लेंगर आणि कर्णधार टिम पेनने संघात जागा दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@