पारोळ्यात दत्त जयंतीनिमित्त ‘महाआरती’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

नगरसेवक पी.जी.पाटील यांच्या हस्ते झाली पूजा

 
 
पारोळा : 
 
येथील चैैैतन्य बुुधनाथ महाराज मठातील दत्त महाराज मंदिरात दत्तजयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्तप्रभूंची महाआरती नगरसेवक पी.जी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
 
 
पारोळ्यातील चैतन्य बुधनाथ महाराज मठाला अनेक वर्षांची परंपरा आहे. परंपरागत श्री दत्त जयंतीला अनेक वर्षापासून आरती करण्याची व महाप्रसाद वाटण्याची प्रथा आहे.
 
भक्तांकडून सांगितले जाते की, बुधनाथ महाराज मठातील श्री दत्त मंदिर जागृत स्थान आहे. तिथे मानलेला नवस श्रद्धाभावाने पूर्ण होत असतो. श्री दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरती करून व नैवेद्य दाखवून भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेतला.
 
 
यावेळी प्रकाश पेंटर, संतोष पेंटर, रवी पेंटर, राजू मिस्तरी, दिनकर शिंदे, बापू शिंदे, साहेबराव शिंदे, दिलीप राजपूत, मुन्ना निकम, बापू शिंपी,आप्पा देशमुख, रावण गुरुजी, डी.के.पाटील, डॉ. निकम, सतीश जोशी, राजू पाटील, पुजारी ईश्वर बाबा आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@