पुण्याच्या वेदांगीने केला 'हा' जागतिक विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |



पुणे - संपूर्ण विश्वाला सायकलवरुन सर्वात जलद प्रदक्षिणा घालणारी आशियातील पहिली महिला म्हणून पुण्याच्या वेदांगी कुलकर्णी हीने रेकॉर्ड केला आहे. तिने हा रेकॉर्ड कोलकातामध्ये पोहोचल्यानंतर रविवारी बनविला. २९,००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणे हे यामधील मुख्य अट आहे. संपूर्ण जगाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पुर्ण करणारी ही २० वर्षाच्या वेदांगीने पूर्ण केले आहे. वेदांगीने या प्रवासाची सुरवात जुलैमध्ये पर्थमधून केली होती. तिला हा रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी पुन्हा ऑस्ट्रेलियातील या शहरात वापस जावे लागणार आहे.

 

वेदांगीने आतापर्यंत १४ देशांचा प्रवास पूर्ण केला आहे. यासाठी तिला १५९ दिवस लागले असून त्या दरम्यान तिने दररोज ३०० किलोमीटर सायकल चालवली आहे. या प्रवासावेळी तिला काही कटू-गोड अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. ब्रिटनच्या जेनी ग्राहम हिच्या नावावर सर्वात कमी दिवसात सायकलवरुन प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड आहे. यासाठी तिला १२४ दिवस इतका कमी वेळ लागला होता. तसेच हा रेकॉर्ड मागील रेकार्डपेक्षा तीन आठवड्याने कमी होता. यामुले वेदांगीने जेनीला शुभेच्छाही दिल्या होत्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@