मंत्रालयातील शिपायांना बढती !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |


 

मुंबई : मंत्रालयातील शिपाई, वाहनचालक आदी चतुर्थश्रेणी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेला तीन वर्षे पूर्ण झाली. जे पदवीपर्यंत शिक्षित व टंकलेखन प्रमाणपत्रधारक आहेत, अशा कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर थेट पदोन्नती देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील सुत्रांनी दिली.

 

सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीनंतर पदोन्नती देण्यात येते. मध्यंतरीच्या काळात घेतलेल्या निर्णयानुसार,महापालिकेच्या कार्यालयातील गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गट 'क' मध्ये लिपिक-टंकलेखक पदावर बढतीने नियुक्ती देण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार यापुढे मंत्रालय संवर्गात ‘ड’ गटात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘क’ गटात थेट पदोन्नती देण्यात येणार आहे.

 

मंत्रालय विभागात चतुर्थश्रेणी पदावर काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्याने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. टंकलेखनातील आवश्यक गती (मराठी ३० शब्द प्र.मि. किंवा इंग्रजी ४० शब्द प्र.मि.) असल्याचे प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र आहे. तीन वर्षे नियमित सेवा केली असेल अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. तर वाहनचालकांना त्यांची इच्छा असल्यास लिपिक-टंकलेखक पदावर बदलीने नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

 
 

­ माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@