इंडोनेशियाला त्सुनामीचा तडाखा ; २२२ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |



जकार्ता : रविवारी रात्री इंडोनेशियामधील सुंडा बेटावर आलेल्या त्सुनामीमध्ये आत्तापर्यंत २२२ लोकांचा बळी घेतला आहे. तर, अनेक जण बेपत्ता आहेत. तसेच या नैसर्गिक आपत्तीमध्ये ८५० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी आहेत. या त्सुनामीचा दक्षिण सुमात्रा आणि पूर्वेकडील जावा किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढू शकते.

 

हिंद महासागरात 'टेक्टॉनिक प्लेट्स' सरकल्यामुळे ही त्सुनामी आली होती. तसेच समुद्रामध्ये भरती आली होती. त्यामुळे त्सुनामीचा जास्त प्रभाव होता, असे इंडोनेशीयाच्या हवामान खात्याने सांगितले. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर याच वर्षी झालेला भूकंप आणि त्सुनामीत ८३२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, डिसेंबर २००४ साली पश्चिम इंडोनेशियाच्या सुमात्रा या ठिकाणी मोठा भूकंप आला होता. या भूकंपाची तीव्रता ९.३ रिश्टर स्केल इतकी होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@