गोरेगावात दुमजली घर कोसळले ७ जखमी, ३ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |



 
 
 
मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर येथे एक दुमजली घर कोसळले. या घराचे बांधकाम सुरु होते. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ७ जण जखमी आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गोरेगावमधील म्हाडा वसाहतीत रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ८ जण जखमी झाले होते.
 

जखमींना तातडीने सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. रामू असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो २२ वर्षाचा होता. रामू हा बांधकाम करणारा मजूर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे. मंगला बानसा, शिनू, हरी वडार, मुन्ना शेख, शंकर पटेल, सरोजा वडार, रमेश निषाद अशी या दुर्घटनेतील जखमींची नावे आहेत.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्यारोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/
 
 
@@AUTHORINFO_V1@@