विलेपार्ल्यात सी. एम. चषकाचे शानदार उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |


 
 
 
 
विलेपार्ले : मोबाईलच्या जमान्यात ज्यावेळी अनेकजण मैदानात येऊन स्पर्धेत सहभागी होतात, खेळाचा आनंद घेतात, हाच खरा जनोत्सव असून अशा महोत्सवांची संख्या वाढली पाहिजे. त्याचबरोबर पार्ले महोत्सवासारखा उत्सव हा गेली १९ वर्षे सातत्याने होत आहे, हे कौतुकास्पद असून २ लाखांहून अधिकजण त्याचा आनंद घेतात, त्यामुळे अशा महोत्सवाचे महत्व अधिक आहे, दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे, त्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री यांनी प्रकाश जावडेकर यांनी विलेपार्ले येथील वामन मंगेश दुभाषी मैदानावर आयोजित १९ व्या पार्ले महोत्सव आणि मुख्यमंत्री चषक उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे भावी पिढीचा उत्कर्ष होणार असून पराग अळवणी त्यासाठी कार्यरत असल्याबद्दल त्यानी प्रंशोसद्गारही काढले.
 

सुप्त कलागुण हे अशा स्पर्धा आणि महोत्सवातून कळत असतात, घडत असतात. त्यामुळे पार्ले महोत्सवाचे महत्व असून दरवर्षी हा महोत्सव बाळसं धरत आहे. यंदा तर या स्पर्धेत इतका भऱघोस प्रतिसाद मिळाला की उद्घाटनाच्या आधीच स्पर्धा सुरू कराव्या लागल्या. यंदा सीएम चषकाचा सहभाग केला असून त्यातून स्पर्धकांना वैविध्यपूर्ण स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर यंदा संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी उपक्रम राबववित असून सर्व स्पर्धकांना संस्कृत भाषेत प्रमाणपत्रं दिली जाणार आहेत, असे महोत्सवाचे आय़ोजक आमदार पराग अळवणी यांनी सांगितले. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी आपल्या समयोचित भाषणात महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सारस्वत बँक सातत्याने अशा उपक्रमांना प्रोत्साहित करत असतेच. त्यातून ती अधिक समाजाभिमुख होत आहे, असे उपक्रम त्यामुळेच समाजात मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत, असेही ते म्हणाले.

 

उद्घाटन सोहळ्यात नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता, अभिजित सामंत व मुरजी पटेल, भाजपा प्रवक्ते संजय ठाकूर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे, संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपूरच्या माजी कुलगुरू उमा वैद्य, सुनीत पठोडिया, पद्मश्री भावना सोमय्या, श्रीकृष्ण आंबेकर, प्रविर कपूर, गुरूचरणजितसिंग सिद्धू, महेश कोकाटे, प्रसाद पाटील, रतन जैन आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना ग्रंथसंपदा देऊन त्यांचे स्वागत आमदार पराग अळवणी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत गोरे यांनी केले. संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार अधिकाधिक व्हावा, यासाठी यंदापासून पार्ले महोत्सवात स्पर्धकांना संस्कृत भाषेतील प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. या उपक्रमाचेही उपस्थितांनी स्वागत केले आहे. या उद्घाटन सोहळ्यात पद्मश्री भावना सौमय्या यांनी लिहिलेल्या केशवा या पुस्तकावर आधारित हे बॅले प्रसिद्ध कोरियोग्राफर अर्ष व समीर तन्ना यांनी सादर केला. केशवा - अष्ट शुद्धी या बॅलेने उपस्थितांची मने जिंकली.

 

दरवर्षी अधिकाधिक रंगतदारपणे होणा-या या महोत्सवात यंदा सीएम चषकाचाही सहभाग आहे. यानिमित्ताने केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देणारे प्रगती करतोय मला महाराष्ट्र माझा या शीर्षकाखालील प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले आहे. उद्यापर्यंत ३० डिसेंबरपर्यंत असलेल्या या महोत्सवात अनेक कार्यक्रम होणार आहे. २४ व २५ डिसेंबर या दिवशी गायन तसेच चित्रकला, हस्तलेखन, रांगोळी, सदृढ बालक, तसेच भाई-पार्ले महोत्सव हे कार्यक्रम होतील तर क्रीडा प्रकारात अॅथलेटिक्स, शरीरसौष्ठव या स्पर्धा होणार आहेत. अधिकाधिक रसिकांनी तसेच क्रीडा प्रेमींना या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

यंदा पार्ले महोत्सव - सी. एम. चषक मध्ये ३५ प्रकारच्या स्पर्धा असून सांस्कृतिक, कला व क्रीडा विभागातील वैयक्तिक व सांघीक स्पर्धामधून सुमारे ६० हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. संपूर्ण महोत्सवामध्ये ३५० प्रथम पारितोषिकांसह सुमारे ६०० बक्षिसे बहाल होणार आहेत. अत्यंत नियोजनबद्ध आयोजित होणाऱ्या या महोत्सवात संपूर्ण मुंबईच्या कानाकोपऱ्याततुन स्पर्धक भाग घेत असून महाराष्ट्राबाहेरूनही स्पर्धक येणार आहेत. १९ व्या पार्ले महोत्सव - सी एम चषक आयोजनामध्ये प्रमुख आयोजक आमदार पराग अळवणी यांच्या समवेत पार्ले विधानसभेतील ज्योती अळवणी, सुनिता मेहता, अनिष मकवानी, अभिजित सामंत व मुरजी पटेल हे नगरसेवक सह-आयोजक म्हणून तर चरणजीत सिंग संधू हे आयोजक समिती प्रमुख, श्रीकृष्ण आंबेकर हे व्यवस्थापन समिती तसेच प्रविर कपूर हे समन्वय समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्यारोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/
 
 
@@AUTHORINFO_V1@@