भुसावळ शहराचा डीपीआर जानेवारीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |

  फेब्रुवारी 2016 पासून आ.सावकारे यांचा पाठपुरावा

 
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 

  • 31 मे 2018 ला प्रत्यक्ष भेटून दिले होते पत्र
  • भुसावळ न.प.ची व्हावी महापालिका
  • सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात शहराचे सर्वेक्षण

भुसावळ, 22 डिसेंबर
भुसावळ तालुक्यासाठी विविध सोयीसुविधांच्या अनुषंगाने डीपीआर (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) आणि आरडीपी (रिव्हाईज डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर अभियांत्रिकी महाविद्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आ.संजय सावकारे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने जानेवारी 2019 मध्ये सुमारे 35 जणांची टीम येथे येवून सर्वेक्षण करणार आहे.
 
 
आ.संजय सावकारे यांनी पुण्याचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ.आहुजा यांची या संदर्भात 31 मे, 2018 रोजी भेट घेतली होती. त्यात त्यांनी भुसावळ तालुक्यासाठी
 
 
डीपीआर बनविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. भुसावळ तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि रिव्हाईज डेव्हलपमेंट प्लॅन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करीत पूर्ण करुन घेण्याबाबत आ.सावकारे यांनी संचालकांना पत्र दिले होते.याबाबत भुसावळ नगरपरिषदेने तसा ठराव मंजूर करुन घेतला असून वरणगाव नगरपालिकासुध्दा असाच ठराव करणार असल्याचे कळते. तसेच तालुक्यातील उर्वरित गावे संबंधित कागदपत्रांची पूर्तता करतील असेही सांगण्यात आले होते.
 
 
असा असणार डीपीआर :- शहरात काँक्रिटीकरण रस्ते, भूमिगत गटारी, भूमिगत केबल, कचरा संकलन, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, बस स्थानक, रेल्वे स्थानक, पोस्ट ऑफिस यांच्या जागांबाबत नकाशे तयार करणे जेणेकरुन भविष्यात अडचण येणार नाही. प्रभागनिहाय विकासात्मकयोजना तयार करणे, तापी नदीकाठाचा उद्यानासह आधुनिक पध्दतीने विकास करणे, ग्रामीण भागातील गावांना जोडणारे रस्ते, लहान - लहान भूखंडांची तपासणी, सहकाराच्या माध्यमातून शेतीला पूरक सर्व योजना अशा परिपूर्ण बाबींचा या डीपीआरमध्ये समावेश राहील. यामुळे डीपीआरनंतर शहरासह तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.
 
 
असे होणार सर्वेक्षण :- 5 दिवस होणार्‍या सर्वेक्षणात शहराचा सामाजिक, भोैगोलिक तसेच विविध अंगाने सर्व्हे होईल. भविष्यातील लोकसंख्या, नागरिकांच्या गरजा व शहराचा विकास यादृष्टिने आराखडा करण्यात येईल. तसेच नागरिकांशीही संवाद साधला जाईल. या सर्वेक्षणासाठी 31 विद्यार्थी व विभागाचे मान्यवर असे 35 जण 5 दिवस भुसावळला मुक्कामी राहतील. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ शहराचाच सर्व्हे केला जाईल. केलेल्या सर्वेक्षणानुसार विकास आराखडा स्थानिक स्वराज्य संस्थेस दिला जाईल. त्याच्या अंमलबजावणीबाबतचे निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था घेईल. भुसावळ शहर व तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी आ.संजय सावकारे 2016 पासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यांनी स्वत:पत्रव्यवहार करुन प्रसंगी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला. त्याला आता यश आले आहे. भुसावळ महापालिका बनण्याकडे वाटचाल?
 
 
भुसावळ नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत व्हावे आणि भुसावळ जिल्हा व्हावा ही मागणी विविध संघटना, नागरिक व राजकीय पक्ष अनेक वर्षांपासून करीत आहे. मध्यंतरी याबाबत बरेच प्रयत्न झाले. डीपीआरनंतर या प्रयत्नांना गती मिळेल अशी अपेक्षा भुसावळवासियांना आहे.
आम्ही शहराचे भविष्याच्यादृष्टिने सर्व बाजूंनी सर्वेक्षण करणार आहोत. तसा आराखडा संबंधित प्रशासनाकडे देणार आहोत. पहिल्या टप्प्यात शहराचे सर्वेक्षण होईल. भविष्यात अडचणी येवू नयेत यासाठी विकास आराखडा राहील.
- डॉ.रावल, सीओईपी
 
 
@@AUTHORINFO_V1@@