लवकरच येणार ‘एअरो बोट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |

 

 

 
 
 
मुंबई : नवी मुंबई आणि मुंबई दरम्यान जलवाहतुकीला नव्या वर्षात हिरवा कंदील मिळणार आहे. तसेच बेलापूर आणि ठाणे या पट्ट्यात एअरोबोट सेवा सुरु होणार असून परिसरातील नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. जमीन, वाळू, दलदलीची जमीन,पाण्याची खोली कमी असलेल्या नद्या आणि बर्फावरूनही ही एअरोबोट चालवता येणार आहे.
 

एअरोबोट ही सेवा सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील वाराणसी ते प्रयागराज या दरम्यान सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर ठाणे-बेलापूर खाडीत ही एअरोबोट सेवा सुरु होईल. पुढील वर्षी मार्च महिन्यात ठाणे-बेलापूरच्या खाडीत ही सेवा सुरु होईल. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशांतर्गत जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आजवर अनेक प्रकल्प आखले आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्पांवर सध्या काम सुरु आहे. काही प्रकल्प हे सरकारकडून राबवले जात आहेत. तर काही प्रकल्पांसाठी खासगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. एखादी खासगी कंपनी जलवाहतुकीसाठी प्रकल्प राबवत असेल तर त्या खासगी कंपनीला सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने स्वीकारले आहे.

 

एअरोबोटच्या संदर्भात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. एअरोबोट निर्मितीसाठी कोराडी येथे सहा एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही एअरोबोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आयआयएएटी आणि चौरंगी संयुक्तपणे प्रशिक्षण केंद्र उभारणार आहेत. पुढील वर्षी २६ जानेवारी पर्यत ही एअरोबोट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

एअरोबोट हा परदेशी आणि भारतीय कंपनीचा संयुक्त उपक्रम आहे. ही एअरोबोट पेट्रोल आणि विजेवर चालणार आहे. एकावेळी १२ प्रवासी या एअरोबोटमधून प्रवास करू शकतात. ताशी १४५ किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता या एअरोबोटमध्ये आहे. मिठी नदी स्वच्छ झाली तर मिठी नदीतूनही ही एअरोबोट सेवा सुरू होऊ शकते. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@