टेंट असो.च्या निषेधाने करपले वांग्याचे भरीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |


थकित बिल मिळण्यासाठी विविध संघटनांतर्फे निषेध, 12.01 वा. झाला विश्वविक्रम,शेफ विष्णू मनोहर यांचा 120 जणांसह पराक्रम

जळगाव : 
 
जळगावात सागर पार्कवर शुक्रवारी एकीकडे 2500 किलो वांग्याचे भरीत बनविण्याचा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र आयोजक मराठी प्रतिष्ठानकडे थकित असलेले गेल्या वर्षीचे टेंटचे बिल मिळण्यासाठी मूक निषेध करण्यात आल्याने वांग्याचे भरीत करपले, असेच म्हणावे लागेल.
 
 
जळगाव टेंट ओनर्स वेलफेअर असो., लाईटिंग डेकोरेटर्स असो., जळगाव जिल्हा कॅटरर्स असो.तर्फे करण्यात आलेल्या या जाहीर मूक निषेधाने आयोजकांची सबंध अधिकारी आणि नागरिकांसमोर शोभा झाल्याचे दिसून आले.
 
 
मागील वर्षी मराठी प्रतिष्ठानने सागर पार्कवर खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात केले होते. त्यासाठी लागणारे संपूर्ण टेंट व लाईटिंग फिटिंगची कामे करून घेत संबंधित असो.ला अ‍ॅडव्हान्स 50 हजार दिले होते.
 
मात्र, उर्वरित रक्कम आतापर्यंत दिली नसल्याने जळगाव टेंट ऑनर्स वेल्फेअर असो., लाईटींग डेकोरेटर्स असो.तर्फे शुक्रवारी कुठलीही अडचण न करता भरीत महोत्सवाचा निषेध करण्यात आला.
 
 
यावेळी जळगाव टेन्ट ओनर्स वेलफेअर असो.चे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष प्रितेश चोरडिया, सचिव सुनील लुल्ला, लाईटिंग डेकोरेटर्स असो.चे अध्यक्ष संतोष दप्तरी, उपाध्यक्ष आरीफ खान, सचिव जयेश खंदार, जळगाव जिल्हा कॅटरर्स असो.चे अध्यक्ष सुनील श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष रामनिवास प्रजापत, सचिव धर्मेंद्र जैन यांच्यासह एकूण 200 हून जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्कम थकित असलेल्यांकडे काम करणे बंद
 
 
 
 
रेणुका माता टेंट हाऊस यांची खाद्य महोत्सवाची थकित रक्कम मराठी प्रतिष्ठानकडे बाकी आहे. याचा निषेध म्हणून पदाधिकार्‍यांनी मूक निदर्शने केली. दरम्यान, यापुढे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थाकडे असो.च्या सदस्याकडे थकबाकी असेल तर त्यांनी थकबाकी दिल्याशिवाय कोणीही सदस्य संबंधितांकडे काम करणार नाही, असा ठराव करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@