वारकरी, पुढारी अन् अधिकारी एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास अशक्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

नंदुरबारला ह.भ.प. प्रकाश महाराज यांचे प्रतिपादन

नंदुरबार : 
 
 
वारकरी, पुढारी व अधिकारी एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. भजन कीर्तनातून संस्कार घडत असतात. भक्तितच सर्वात मोठी शक्ती सामावलेली असून वारकरी संप्रदायातून समानता व समाज एकात्मतेचे दर्शन घडत असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज (बोधले) यांनी केले.
 
 
नंदुरबार येथे अखिल भारतीय वारकरी मंडळ, नंदुरबार जिल्हा कमिटी आयोजित राज्यस्तरीय वारकरी संमेलन तथा भव्य कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायणाचे 21 डिसेंबर ते 28 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले असून या राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर प्रकाश महाराज (बोदले) खासदार हीना गावीत, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी, यशोदाताई जायखेडेकर, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोधले महाराज बोलत होते.
 
 
बोधले महाराज पुढे म्हणाले की, वारकरी मंडळाने समाजात मोठ्या प्रमाणात प्रबोधनाचे काम केले असून शासनाच्या स्वच्छता अभियान, हगणदरीमुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी वारकरी मंडळाने मोठ्या प्रमाणात योगदान दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना म्हणाले की, वारकरी संप्रदाय व माझ्या स्वच्छता अभियानापासून परिचय आहे, वारकरी संप्रदाय प्रबोधनाच्या माध्यमातून राष्ट्र घडवायाचे काम केले आहे.
 
 
राज्यात ग्रामस्वच्छता व स्वच्छता अभियानाला वारकरी संप्रदायाने मोठ्या प्रमाणात चालना दिल्यामुळे स्वच्छता अभियानात यशस्वी होत आहे. वारकरी संप्रदायाला मी जिल्हा प्रशासनामार्फत धन्यवाद देतो व सर्व वारकर्‍यांचे आभार मानतो असेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. यावेळी विजू चौधरी, विक्रांत मोरे, डॉ. तुषार संचेती यांचेही समयोचित भाषण झाले.
वारकरी संप्रदायाकडून एकात्मतेचा संदेश
 
अध्यक्षीय भाषणात खा. हीना गावीत म्हणाल्या की, वारकरी संप्रदाय एकात्मतेचा संदेश सगळीकडे घेऊन जातात. वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा संदेश देतात. माझी आजीसुध्दा वारकरी संप्रदायाची असून ती आजही दिंडीत जाते. दिंडीत गेल्यामुळे भक्ती भावनेने तिच्यात शक्ती निर्माण होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@