दुकानासमोर कचरा टाकणार्‍या व्यापार्‍यांना तळोदा नगराध्यक्षांनी सुनावले खडेबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
 
तळोदा : 
 
शहरातील अनेक दुकानांच्या समोरील रस्त्यावर कचरा टाकलेला आढळून आल्याने संतप्त झालेल्या नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी व्यापार्‍यांना खड़ेबोल सुनावले. स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची असून यापुढे कचरा आढळल्यास दंड आकारण्यात येईल, अशा सूचना त्यांनी या वेळी व्यापार्‍यांना दिल्या.
 
 
तळोदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र माळी तसेच पालिकेच्या कर्मचार्‍यांसोबत शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.
 
 
तळोदा पालिकेच्या वतीने ओला कचरा व सुका कचरा पेटी वाटप करण्यात आल्या. स्वच्छताबाबत उदासीनता दिसून येत असल्याने गाडीवाला आया घरसे कचरा निकाल हे गीत वाजवत कचरा संकलन करण्यात येत आहे. तरीही स्वच्छतेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळावा, या उद्देशाने स्वतः नगराध्यक्ष यांना आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. नगराध्यक्ष फिरत असल्याने ही शहरातील पहिलीच वेळ असल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या.
 
 
याबाबत नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सांगितले की, तळोदा पालिकेत सत्ता स्थापन होऊन वर्ष उलटले असून याबाबत स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पनेस आम्ही अग्रक्रम दिला असून याबाबतीत अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
 
 
मात्र लोकसहभाग शिवाय हे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील जबाबदारी घेत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. दरम्यान आज शहरातील शौचालय, स्वच्छतागृह, गटारी यांची पाहणी प्रमुख बाजारपेठ बसस्थानक परिसरात करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@