आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत साधना चव्हाण प्रथम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

शेठ नारायण बंकट वाचनालयातर्फे स्पर्धांचे आयोजन

 
 
चाळीसगाव : 
 
चाळीसगाव: शेठ नारायण बंकट वाचनालय आयोजित स्व. प्रा. मंदाताई व स्व. डॉ. श्यामकांत वा. देव स्मृती करंडक आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत य. ना. चव्हाण महाविद्यालय चाळीसगावची साधना प्रकाश चव्हाण ही विद्यार्थिनी सर्वप्रथम आली.
 
 
स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच भारतीय सिंधू सभा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रितमदास रावलानी, वाचनालयाचे कार्यवाह प्रा. दीपक शुक्ला, स्पर्धा परीक्षा समितीचे निमंत्रक राजेंद्र चिमणपुरे, परीक्षक श्रीकांत दाणी, जळगाव, प्रा. चारुता गोखले जळगाव, सुनंदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
परीक्षकांचा परिचय विश्वास देशपांडे यांनी करून दिला.दिवसभर चाललेल्या स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभासाठी जि. प. शिक्षण क्रीडा व अर्थ विभागाचे सभापती पोपटतात्या भोळे उपस्थित होते. सुरुवातीला वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षा समितीचे निमंत्रक राजेंद्र चिमणपुरे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश व वाचनालयाची माहिती उपस्थिताना दिली.
 
 
स्पर्धेसाठी परीक्षक असलेल्या श्रीकांत दाणी यांनी स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धकांतील उणिवा त्यांचे गुण-दोष इत्यादींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
 
वाचनालयाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रितमदास रावलानी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धेच्या प्रायोजिका सुजाता अवचट यांनी यावेळी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले.
 
 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोपटतात्या भोळे व अध्यक्ष प्रितमदास रावलानी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यात य. ना. चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी साधना चव्हाण हिला प्रथम 2500 रु. व स्मृतिचिन्ह, बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी तृप्ती पाटीलला द्वितीय पारितोषिक 1700 तर नमिता पाटील शिरपूर हिस तृतीय पारितोषिक 1400 रु., प्रसाद जगताप धुळे, अपेक्षा कापडणीस नामपूर, धर्मेश हिरे धुळे, सागर बोरसे चाळीसगाव, जागृती सोनवणे कळमडू, सागर शितोळे चाळीसगाव यांना प्रत्येकी रुपये तीनशेचे पारितोषिक देण्यात आले.
 
 
या स्पर्धेत जळगाव धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सुमारे 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सूत्रसंचालन विश्वास देशपांडे व प्रा. मालती निकम यांनी यांनी केले. प्रमुख पाहुणे जि. प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे व सुजाता अवचट यांचा परिचय प्रा.ल.वि. पाठक यांनी करून दिला. आभार वाचनालयाचे कार्यवाह प्रा. दीपक शुक्ला यांनी मानले.
 
 
यावेळी वाचनालयाचे सभासद, पत्रकार किसनराव जोर्वेकर, नारायण परदेशी, संचालक बाबासाहेब चंद्रात्रे, सुबोध मुंदडा, मधुकर कासार, डॉ. मुकुंद करंबळेकर, मिलिंद देव हे वाचनालयाचे संचालक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी वाचनालयाचे ग्रंथपाल व ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, ज्योती पोतदार, प्रशांत वैद्य, श्याम रोकडे, महेश भंडारी, निखिल नाईक यांनी परिश्रम घेतले.
 
वाचनाने ज्ञानात वृद्धी : पोपटतात्या भोळे
 
 
वाचनातून ज्ञान मिळते, वाचनाने ज्ञानात वृद्धी होऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता येते. त्यासाठी वाचन प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जीवनात आवश्यक असल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जि.प.शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@