‘एक निर्णय’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |


 


मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या प्रसंगी 'निर्णय' खूप महत्वाचा ठरतो. या निर्णयावरच आयुष्याच्या अनुभवांची गाठ बांधलेली असते. नववर्षाच्या निमित्ताने असाच 'एक निर्णय' अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी घेतला आहे. 'एक निर्णय - स्वतःचा स्वतःसाठी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने श्रीरंग देशमुख मराठी चित्रपटाच्या लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. नव्या वर्षात त्यांचा 'एक निर्णय- स्वतःचा स्वतःसाठी' हा सुबोध भावाचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दादर येथे नुकतेच त्याचा संगीत अनावरण सोहळा पार पडला.

 

हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातले एक मोठे स्वप्न आहे. त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मी आता एक एक पाऊल टाकत आहे. माझ्या सगळ्या आप्तस्वकीयांची साथ आणि गुरूंचे आशीर्वाद यांच्यामुळेच मी माझ्या ध्येयापर्यंतचा हा प्रवास करू शकलो. चित्रपटाचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल.” असा विश्वास दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

 

चित्रपटाच्या कथेला पूरक अशी ४ वेगवेगळ्या ढंगातली गाणी या चित्रपटामध्ये आहेत. या चित्रपटाचे गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार कमलेश भडकमकर आहेत. या चित्रपटाची गाणी अंजली मराठे, ऋषिकेश कामेरकर, निहिरा जोशी-देशपांडे, जयदीप वैद्य, श्रुती आठवले या सुप्रसिद्ध नव्या दमाच्या गायकांनी गायली आहेत. विशेष म्हणजे रोहन श्रीरंग देशमुख यानेसुद्धा यामधील एक गाणे संगीतबद्ध केले आहे. “आपण केलेल्या अनेक कामांपैकी काही ठराविक कामं अशी असतात जी लोकांसमोर येण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत असतो. तसंच या चित्रपटासाठी लिहिलेली गीते लोकांसमोर येण्याची मी वाट बघत होतो.” अशा भावना गीतकार वैभव जोशी यांनी व्यक्त केल्या.

 

सुबोध भावे, मधुर वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, कुंजीका काळवींट या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील,सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. स्वरंग प्रॉडक्शनची ही पहिलीच निर्मिती आहे. येत्या १८ जानेवारीला 'एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@