विजय सैतवाल यांना राज्यस्तरीय मौलाना आझाद पर्यावरण मित्र पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
जामनेर :
 
अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे नेहरू युवा केंद्र भारत सरकार संलग्न मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तींना भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
विजय सैतवल यांना राज्यस्तरीय मौलाना आझाद पर्यावरण मित्र पुरस्कार आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
यावेळी व्यासपीठावर शिवराणा व्याख्याते संतोष पाटील, जि. प.सदस्य पल्लवीताई देशमुख, सतीश देशमुख, सचिन सोमवंशी, कमलाकर पाटील, शीतल पाटील, मजिद जकेरिया, फारुख शेख, संदीप पाटील, भावना शिरसेकर, संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष सलीम इनामदार, समन्वयक प्रवीण पाटील व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
 
त्यांनी पारसनाथ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून जीवदया, राष्ट्रीय एकात्मता, गरजूंना मदत यासारखे उत्कृष्ट कार्य केले. यावेळी सैतवाल यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्पदेखील केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@