गुरुदत्त जयंतीनिमित्त कांचननगरात पालखी सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
कांचननगरातील जागृत गुरुदत्त मंदिर संस्थानतर्फे गुरुदत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला 4 ते 6 वाजता गुरुचरित्र व श्रीमद्भागवत पुराण व दत्तगुरुंच्या पादुकांची पालखी काढण्यात आली.
 
पालखीचे उद्घाटन विश्वस्त राजेंद्र कोळी, अरुणा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणुकीत कळस तुळशीवृंदावन घेऊन तसेच विविध वेशभूषा परिधान करून महिला व पुरुष सहभागी झाले होते. दत्त मंदिर फुलांनी व रोषणाईने सजविण्यात आले आहे.
 
 
आज विविध कार्यक्रम
 
 
गुुरुदत्त मंदिरात शनिवार, 22 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सकाळी 5 ते 6 वा. अभिषेक, काकडआरती, सकाळी 6 ते 7 वा. होमहवन, सकाळी 9.30 ते 11.30 वा.हभप मनोज महाराज जोशी पिंप्राळेकर यांचे काल्याचे कीर्तन, सकाळी 11.30 ते दुपारी 12 वा.पुरस्कार वितरण व सत्कार सभारंभ, दुपारी 12 वा. आ. सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती होणार असून अध्यक्षपदी नगरसेवक कैलास सोनवणे हे असतील. तर प्रमुख पाहुणे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे आदी उपस्थित राहतील.
 
तसेच दुपारी 12 ते 2.30 दरम्यान महाप्रसाद, संध्या.6 ते 7 वा. हरिपाठ, रात्री 9 ते 12 हभप सुनील महाराज (मुक्ताईनगर) यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त राजेंद्र कोळी, ज्ञानेश्वर कोळी यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@