मुक्ताईनगरच्या जे.ई. स्कूल ज्युनियर कॉलेजचे विशेष हिवाळी शिबीर उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
 
मुक्ताईनगर : 
 
जे.ई. स्कूल ज्यू. कॉलेज मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष हिवाळी शिबीर 13 ते 19 डिसेंबरदरम्यान पिंप्रीपंचम येथे पार पडले.
 
शिबीर उद्घाटनप्रसंगी बाजार समिती सदस्य भगवान पाटील, बोदवड, पिंप्रीपंचमच्या सरंपच प्रतीक्षाताई रामदास चौधरी, उपसरपंच गोपाळ श्रावण कोळी, पिंप्रीपंचम तसेच ग्रामस्थ व जे. ई. स्कूल ज्यू. कॉलेजचे प्राचार्य आर.पी.पाटील, जे.ई.स्कूलचे व्ही.एम.चौधरी व ज्यू. कॉलेजचे शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रा.व्ही.बी.राणे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर. पी. पाटील यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. स्वच्छतेचे, श्रमदानाचे महत्त्व सांगितले.
 
 
शिबीर काळात विद्यार्थ्यांनी श्रमदानात ग्रामस्वच्छता केली. अन्नपूर्णा मंदिर परिसर, समाज मंदिर, धाबे पिंप्री येथील मराठी शाळा परिसरात स्वच्छता केली.
 
शिबीर समारोपप्रसंगी बोदवड बाजार समितीचे सदस्य भगवान पाटील पिंप्रीपंचम येथील ग्रामस्थ तसेच जे.ई. स्कूल ज्यू. कॉलेज व किमान कौशल्य विभाग मुक्ताईनगरचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
 
 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.व्ही.बी.राणे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. प्रा.एस.ए.नारखेडे यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. आर.एम. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी एल.व्ही.गिरासे यांनी प्रास्ताविक केले. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. एच. आर. झांबरे यांनी आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@