भारतीय संस्कृती, संस्कार, नीतिमूल्यांचे जतन अन् संवर्धन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

भुसावळच्या श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित शैक्षणिक विश्वाचे उदात्त, प्रेरणादायी कार्य


 
भुसावळ : 
 
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संस्कार आणि नीतिमूल्यांचे जतन व संवर्धन करतानाच काळाच्याही पुढे धावत त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे लाभ देण्यात सरस ठरल्या आहेत, भुसावळ येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित शिक्षण संस्थेच्या सर्वच शाखा. अर्थात जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, अहिल्यादेवी कन्या विद्यालय आणि महाराणा प्रताप विद्यालय.
 
 
मंडळाचे अध्यक्ष आहेत बापूराव मांडे, ज्यांनी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून जगत आणि संघाची विविध पदे भूषवत तब्बल 1 तप संघाचे जिल्हा कार्यवाह म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्या बापूराव तथा प्रभाकर मुरलीधर मांडे यांच्या कार्यकर्तृत्वाचे दृश्य रूप आहे या संस्था. केवळ गुणवत्ता हाच निकष, प्रशासन शिस्तबद्ध, काटेकोर. यामुळे अध्यापन कसदार, दर्जेदार राहत आले आहे.
 
 
गेल्या 25 वर्षांपासून ते शालेय समितीचे अध्यक्षही आहेत, तर उपाध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापिका उषाताई पाटील. सचिवपदाची सूत्रे आहेत महेंद्र उर्फ सोनू मांडे यांच्याकडे.
 
 
1935 मधील ही संस्था... सध्याच्या महाराणा प्रताप विद्यालयाची जागा ही 75 वर्षापासून भाड्याची होती...ती खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण झाले ते 2014 मध्ये.
 
 
1989-90 मध्ये तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष डॉ. जोग यांनी संस्थेची धुरा बापूसाहेब यांच्याकडे सोपविली. आणि त्यांनी पुढे राष्ट्रधर्माचे पालन करीत इंग्रजी गुलामगिरीचे बंध तटातट तोडून या संस्थांना अंतर्बाह्य अस्सल भारतीय चेहरा दिला.भुसावळ एज्युकेशन सोसायटीचे नामकरण करवीर पीठाचे पूज्य शंकराचार्याच्या हस्ते 1992 मध्ये ‘श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ’ असे झाले. गर्ल्स हायस्कूलचे नामकरण ‘अहिल्यादेवी कन्या विद्यालय’ असे तत्कालीन सरकार्यवाह रज्जूभैय्याजी यांच्या हस्ते झाले. न्यू इंग्लिश स्कूलचे नामकरण ‘महाराणा प्रताप विद्यालय’ असे रा.स्व.संघाचे तत्कालीन अ.भा.शारीरिक शिक्षण प्रमुख सुरेशराव केतकर यांच्या हस्ते झाले. प्राथमिक शाळा भुसावळचे नामकरण जिजामाता प्राथमिक मंदिर असे प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झालेले आहे.
 
 
अहिल्यादेवी विद्यालयात 1125 विद्यार्थिनी आहेत. पाचवी ते दहावीचे प्रत्येकी 3 वर्ग (तुकड्या) आहेत. 5 दिवसीय शारदोत्सव म्हणजे धमाल असते. अग्रभागी लक्ष्मीमाता, अहिल्यादेवी यांच्या वेश-केशभूषेतील घोडेस्वार मुली, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, वारकरी दिंडीत यथोचित वेश-केशभूषेत सहभागी संतांची प्रतिरूपे, नऊवारी परिधान केलेल्या 200 विद्यार्थिनींचे लेझीम पथक, नवयुगातील पेहेराव म्हणजे जीन्स व कुर्ती यातील 60 विद्यार्थिनींचे झांजपथक, गरबा नृत्यात रममाण 200 विद्यार्थिनी यासह शिक्षकांचा सहभाग असलेली ही भव्य शोभायात्रा सकाळी साडेदहा ते दीड यावेळात शहराच्या प्रमुख मार्गावरून निघते. ती भुसावळकरांचे आकर्षण ठरणारी राहत आलेली आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा होतात. यावर्षी स्त्रीशक्तीचा आविष्कार आणि महिला सबलीकरण केंद्र मानून व्याख्यान, चर्चासत्र, प्रश्नोत्तरे यांचे आयोजन होते. अनुभवविश्व समृद्ध होण्यासाठी सकाळ विभागाच्या पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींची राज्यात (यावर्षी 2 मुक्काम आणि 3 दिवस अशी सप्तशृंगी गड, नाशिक व नगर जिल्हा सहल) आणि दुपार विभागाच्या विद्यार्थिनींची अन्य राज्यात सहल काढण्यात येते. (यंदा 4 मुक्काम व 5 दिवस सहल बंगलोर, उटी आणि म्हैसूरला)
 
 
 
जिजामाता प्राथमिक विद्यालय-विद्यार्थिनी संख्या 1100, पहिली ते चौथी, प्रत्येकी 4 तुकड्या, असे 16 वर्ग. अध्यापक- 18 आणि शिक्षकेतर -2 जिजामाता जयंतीदिनी दिवसभर विविध स्पर्धा व गुणदर्शनपर उपक्रम होतात. पालक मेळावा, दहीहंडी (कृष्णराधा वेशात मुस्लीम विद्यार्थिनीही सहभागी होतात), सहल, शिष्यवृत्तीचे विशेष वर्ग, महाराणा प्रताप -सर्वात जुनी पाचवी ते दहावीच्या प्रत्येकी 3 तुकड्या, विद्यार्थी संख्या 950, अध्यापक- 28 आणि शिक्षकेतर -4 असे मोठे शैक्षणिक विश्व येथे उभे आहे.
(संपर्क-महेंद्र उर्फ सोनू मांडे 9422284745)

काळाच्याही पुढे धाव: ‘ब्रॉडकॉस्ट’ ग्रुप योजना
 
 
सध्याच्या तांत्रिक क्रांतीचा लाभ विद्यार्थी, पालक आणि अध्यापक या 3 घटकांना मिळावा, या उदात्त हेतूसाठी संस्थेने या वर्षापासून अतिशय कल्पक व अभिनव उपक्रम आरंभला आहे. सर्व वर्गांचे शिक्षक गृहपाठ टाईप करून त्या त्या विद्यार्थ्यांचा पालकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवतात. विद्यार्थी घरी पोहोचत नाही, त्या आधीच पालकांना संदेश मिळालेला असतो. यामुळे पालकांनाही पाल्यांकडे लक्ष देणे, शिक्षकांशी संपर्कात राहणे भाग पडते.
 
 
याचा परिणाम शैक्षणिक परिवाराचे परस्पर ऋणानुबंध घट्ट होत असून विद्यार्थ्यांची सर्वांगीण उन्नती होईल, असे दिसते. सर्व शाळांचा खेळ विभाग समृद्ध आहे. तलवारबाजी, बेसबॉल, सॉफ्टबॉल, कॅरम, बुद्धिबळ, खो-खो, आट्यापाट्या, कबड्डी, थ्रो बॉल आदींमध्ये सर्वप्रकारच्या स्तरावर दोन्ही माध्यमिक विभागांचा दबदबा आहे. 150 वर खेळाडू राष्ट्र, राज्यस्तरावर चमकले असून 4 जणांना थेट शासकीय नोकरी लाभली असून 8-9 जणांना ती संधी आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, आत्मविश्वास निर्माण करण्यात यश आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@