डांभुर्णीत आशावली बाबांचा यात्रोत्सव उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

डांभुर्णी ता. यावल : 
 
यंदाही सालाबादप्रमाणे हजरत आशावली बाबांची यात्रा भरली होती. या यात्रेत परिसरातील हिंदू-मुस्लीमबांधवांनी सहभाग घेऊन एकतेचे दर्शन येथे पाहावयास मिळाले.
 
 
नागरिकांनी आनंद घेत शांततेत बाबांचे दर्शनही घेतले. या यात्रोत्सवात पाळणे, झुले, खेळण्यांचा लहान मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. तरुणांचा लोकनाट्य तमाशांसह गुळगुळीचा खेळ, व लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. रोजंदारी करून यात्रेच्या आशेने जोडलेल्या पै पै रुपयांनी महिलांचा संसार उपयोगी वस्तू पितळी भांडी, तांब्याची भांडी व अल्युमिनियम भांडी खरेदीवर जास्त प्रतिसाद दिसून आला.
 
 
यात्रोत्सव शांतेत पार पडावा, यासाठी यावल पो.नि.डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.ढोमणे, हे. कॉ. सुनल तायडे, विकास सोनवणे आदी सहकारी उपस्थित होते.
 
 
विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी अभियंता डी.आय.पाटील यांच्या संपूर्ण कर्मचार्‍यांची रात्रभर उपस्थिती होती.
बाबांच्या दर्ग्यात अस्लमशहा खलीलशहा, आकबरशहा गुलाबशहा, अरमानशहा बिसमिल्लाशहा यांनी कामकाज पाहिले.
@@AUTHORINFO_V1@@