डॉ. अविनाश आचार्य फिरता चषक शानभागकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण उत्साहात

 
 
जळगाव : 
 
विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचा शुक्रवार, 21 रोजी बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. त्यात विवेकानंद प्रतिष्ठानच्या कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालय, श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालय, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांचा सहभाग होता.
 
 
प्रमुख पाहुणे राष्ट्रीय खो - खो खेळाडू डॉ. देवदत्त पाटील यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, कोषाध्यक्षा पूनम मानुधने, क्रीडा समन्वयक सूर्यकांत पाटील आणि सर्व विभागाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय शानभाग विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जितेंद्र पाटील यांनी केला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
डॉ.देवदत्त पाटील म्हणालेे की, संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी मैदानावर खेळला पाहिजे, ही शाळेच्या व्यवस्थापनाची तळमळ आजच्या या कार्यक्रमातून आपणास दिसत आहे. अभ्यासासोबत व्यायाम केल्यास गुण कमी होत नाही तर ते वाढतातच. विद्यार्थ्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, असेही त्यांनी सांगितले.
 
 
जयंतराव टेंभरे, पद्माकर इंगळे, अमितसिंघ भाटीया, मिलिंद पुराणिक, हेमराज पाटील, शशिकांत पाटील यांची उपस्थिती होती.
दोन दिवस झालेल्या स्पर्धांमध्ये फुटबॉल, लंगडी, खो-खो, व्हॉलीबॉल, धावणे 100मी, धावणे 200 मी, 100 मी. रिले, कबड्डी, रस्सीखेच, बुद्धिबळ, बॅडमिंटन आदी स्पर्धांमध्ये 20 आणि 21 रोजी झालेल्या विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सलग पाचव्या वर्षी शानभाग विद्यालयाने डॉ. अविनाश आचार्य फिरता चषक पटकाविला.
 
 
सूत्रसंचालन स्मिता चव्हाण आणि सुजाता ठाकरे यांनी केले. तर आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व विभागातील विभाग प्रमुख, क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर सदस्यांनी सहकार्य केले.
 
शाळानिहाय पदतालिका
 
शाळा                        सुवर्णपदक       रजतपदक     कांस्यपदक    एकूण
शानभाग विद्यालय            18                     19               06             43
काशिनाथ पलोड              17                     17               03             37
इंग्लिश मीडियम               17                     16               09             42
श्रवण विकास मंदिर           03                    01                02             06
@@AUTHORINFO_V1@@