100 वर्ष जगू या उपक्रमात भडगावी 515 रुग्णांची तपासणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |


 
 
 
भडगाव :
 
मास्टरलाईन फाउंडेशन व विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला 100 वर्ष जगू या उपक्रमात 30 तपासण्या 515 रुग्णांच्या करण्यात आल्या. रविवारी लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात तपासणी व रिपोर्ट वितरण कार्यक्रम पार पडला.
 
 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. किशोर पाटील उपस्थित होते. मास्टरलाईनचे समीर जैन यांनी उपक्रमाबाबची भूमिका स्पष्ट केली. डॉ भूषण मगर यांनी मनोगतात विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या वाटचालीविषयी सांगितले.
 
 
माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, निवृत्त पोलीस अधिकारी आर.के. वंजारी, चौधरी, डॉ. निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आ. किशोर पाटील यांनी वैद्यकीय सेवेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे उपस्थितांना सांगितले. यावेळी डॉ. पंकज संघवी यांनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. स्वप्निल पाटील यांनी आयुर्वेदातील पंचकर्म उपचार पध्दतीवर मार्गदर्शन केले.
 
 
व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, मास्टरलाईनचे सुयोग जैन, अनिल पवार, आ. एल.माळी, डॉ. अशोक ओस्तवाल, डॉ. दुर्गेश रुळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुयोग जैन व आभार अंबिका घोष यांनी मानले.
 
 
उपक्रमासाठी भडगाव डॉक्टर असोसिएशन , औषधी विक्रेता संघ भडगाव, सिनियर सिटिझन्स संस्था, आनंदघन संस्था व मास्टरलाईन परिवार आदींचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@