खेडी परिसरात जनजागरण रॅली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
माहिती व प्रसारण मंत्रालय फिल्ड आऊटरीच ब्यूरो, जळगाव यांच्यातर्फे खेडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पार्वतादेवी प्राथ. विद्यालय आणि ज्यु.कॉलेज आणि सद्गुुरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी जनजागरण रॅली काढली.
 
 
विनोद ढगे यांच्यासह सहकार्‍यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
नगरसेवक भरत कोळी, धुडकू सपकाळे, मनपाचे अधीक्षक एस.बी.बडगुजर, मनपाचे आरोग्य अधिकारी उदय पाटील, आरोग्य अधीक्षक एस.पी.अत्ररदे, आरोग्य निरीक्षक एस.ई.लोखंडे, गोकुळ पाटील, पार्वतादेवी माध्य. शाळेच्या शिक्षिका योगीता पाटील, छोटू पाटील, सद्गुरू शाळेच्या शिक्षिका योगीता पाटील, पौणिमा पाटील, रुपाली पाटील आदी उपस्थित होते.
 
 
प्रास्ताविक उल्हास कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार विनोद ढगे यांनी केले. विद्यार्थिनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यशस्वितेसाठी तुषार कोल्हे, गणेश कोळी, बापू पाटील यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@