पी.वाय.चौधरी विद्यामंदिरात स्नेहसंमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |
फैजपूर, ता. यावल :
 
येथील भक्त मंडळ संचालित व शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित पी.वाय. चौधरी प्राथमिक व बालक विद्यामंदिराचा वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी झाला.
 
 
अध्यक्षस्थानी संस्था कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी तर उद्घाटक संस्थाध्यक्ष डॉ. नितीन काशिनाथ महाजन होते. प्रमुख खंडोबा देवस्थानचे पुजारी महंत राममनोहर दासजी, संचालक डॉ.जी.एस वर्मा, पुंडलिक माळी, ओंकार सराफ, मुख्याध्यापक संजय चौधरी, मुख्याध्यापिका मंगला टोके, गणेश गुरव आदी उपस्थित होते.
 
 
भाजपचे संजय रल, आरिफ शेख, किरण पाटील, चंद्रकांत भिरुड, गंगाराम कोळी, मनोज वैदकर, धनराज कोळी, सुनील कोळी यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख पूनम भंगाळे तर आभार शिल्पा बढे यांनी केले. यशस्वितेसाठी शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@