दर्यापूरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |
वरणगाव :
 
येथून जवळच असलेल्या वरणगाव फॅक्टरी लगत असलेल्या दर्यापूर शिवारातील सुशील नगरात सात जण खुलेआम इलेक्ट्रीक पोलच्या लाईटाच्या उजेडात जुगार खेळ असताना त्यांच्याजवळ रोख रक्कम आठ हजार 360 रुपये व जुगाराच्या साधनासह मिळून आल्याने सात आरोपींविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वरणगाव फॅक्टरी लगत असलेल्या दर्यापूर शिवारातील सुशीलनगरमधील शामराव इंगळे यांच्या घराजवळ मोकळ्या जागी इलेक्ट्रीक पोल लाईटाच्या उजेडात आरोपी रवींद्र चिंधू गाढे वय 38 राहणार दर्यापूर शिवार, सतीश चंदू बर्‍हारे वय 40 राहणार मिलिंदनगर, वसंत गुलाब कोळी वय 62 राहणार कोळीवाडा वरणगाव, नरेंद्र गणपत बोदडे वय 38 राहणार मुक्ताईनगर, मिलिंद भीमराव सुरवाडे वय 38 राहणार तळवेल, संदीप मधूकर सुरवाडे वय 32 राहणार तळवेल , मधुकर काशिनाथ सुरवाडे वय 68 राहणार तळवेल वरील आरोपी यांनी त्यांचे स्वतःचे फायदयासाठी जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असताना रोख रक्कम 8,360 रुपये जुगाराच्या साहित्यासह मिळून आले.
 
पोलीस हवालदार राहुल भानुदास येवले यांच्या फिर्यादीवरून भाग 6 गुरनं 65 / 18 मुंबई जुगार कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे वरणगाव पोलीस ठाण्यात वरील सात जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.हे. कॉ. नागेंद्र तायडे करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@