ग्रामीण रुग्णालयासमोरच शौचालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

पहूर विश्रामगृहाच्या सौंदर्यास बाधा; महिलांची बंदिस्त शौचालयाची मागणी

 
 
पहूर, ता.जामनेर :
 
पहूर-पाचोरा रोडवरील ग्रामीण रूग्णालयासमोरच महिलांचे शौचालय असल्याने परिसरात नेहमी दुर्गंधी असते. मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने येणारे जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच वाहनधारकांची नेहमी वर्दळ असते.
 
रूग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रूग्णांचा वापर असतो. परंतु विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरच शौचालय असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बंदिस्त शौचालय उभारा अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.
 
 
पहूरपेठ ग्रामपंचायतीने गेल्या सात वर्षापासून पहूर-पाचोरा रस्त्यावरच विश्राम गृहाच्या दर्शनी भागात महिलांच्या शौचालयासाठी व्यवस्था केलेली आहे. मुख्य रस्त्यावरच आवार शौचालय असल्याने विश्राम गृहाच्या गेटवरच लहान मुले, मुली उघड्यावर शौचास बसतात.
 
वराहांचा वावर असल्याने दुर्गंधी फैलून नेहमी अस्वच्छता असते. आवार शौचालयाला लावलेली पत्रेसुध्दा कमी उंचीची असल्याने महिलांना संकोच निर्माण होत असतो.
 
 
संतोषीमातानगर, नेहरू नगर भागातील नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. पहूरच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत असून पहूरपेठ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच्या निता पाटील यांनी दखल घेऊन या भागातील आवार शौचालय हटवून महिलांसाठी बंदिस्त दहा शीटचे शौचालय बांधावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@