वीज दरवाढीविरोधात रा.काँ.चे निवेदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
महाराष्ट्रात विजेचे दर त्यातही औद्योगिक विजेचे दर शेजारच्या राज्यांच्या तुलनेत 20 ते 30 टक्के अधिक आहे. त्यातच 1 सप्टेंबर, 2018 पासून महावितरणने 15 ते 20 टक्के दरवाढ केली आहे.
 
ती दरवाढ त्वरित रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसपाटीतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.
 
जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, माजी नगरसेवक राजू मोरे, दुर्गेश पाटील, वाय.एस.महाजन, मुकूंद एडके, अश्विनी देशमुख, लता मोरे, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी, महानगर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रिजवान खाटीक, प्रतिभा शिरसाठ, अनिरुद्ध जाधव, उज्ज्वल पाटील, आशा येवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
या आहेत मागण्या
 
 
दरवाढ त्वरित रद्द करावी तसेच सप्टेंबर 2018 पासून लावण्यात आलेली पॉवर फॅक्टरची पेनल्टी तसेच न दिलेले रिबेट इ.पुढील येणार्‍या बिलांमध्ये क्रेडिट करण्यात यावी. वीज मीटरमध्ये ठर्ज्ञींरह ङअॠ तसेच ठर्घींरह ङएअऊ रीडिंग पाहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे उद्योजकांना पॉवर फॅक्टर संभाळता येत नाही. त्यामुळे त्वरित मीटर बदलून देण्याची व्यवस्था करावी आणि तोपर्यंत पॉवर फॅक्टरची पेनल्टी लावू नये तसेच वीज जाण्याचे प्रकार थांबावेत.
@@AUTHORINFO_V1@@