स्थायी समिती सभापती शैक्षणिक गुणवत्तेवर देणार भर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
मनपा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मंगळवारी प्रशासन अधिकारी मनपा शिक्षण मंडळ यांच्या नवीपठ शाळेतील कार्यालयात मनपाच्या रिक्त शाळा, विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, सुरू असलेल्या शाळेबाबत त्यांनी प्र. अधिकारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
 
दरम्यान यावेळी शिक्षण मंडळाच्या कामकाजात येणार्‍या अडीअडचणीही जाणून घेतल्या. दरम्यान, शाळेत अनधिकृत वाहनांवर कारवाई, गेट व वॉल कंपाऊंडची दुरुस्ती, 1 लिपिक व शिपायाची नियुक्ती, याबाबत अधिकार्‍यांनी सभापतींकडे विनंती केली.
 
 
सर्व शिक्षा अभियानांतर्गत सभापती यांनी विद्यार्थ्यांना मिळणारे गणवेश अनुदानासंबंधी माहिती घेऊन उपस्थितीतांना मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी त्यांनी संसाधन कक्ष व ध्वनी विरहित साधन कक्षमध्ये, मनपामार्फत करण्यात येणार्‍या दिव्यांग विद्यार्थी थेरपी व चाचण्यांबाबत माहिती घेतली व प्रत्यक्ष पाहणी केली.
 
निवृत्त शिक्षकांनी 50 टक्के पगार वेळेवर होण्यासाठी तसेच मनपाच्या सुरू असलेल्या शाळेच्या गुणवत्ता वाढवणेबाबत सामाजिक संस्थांच्या सीएसआर फंडातून अनुदान प्राप्त कसे करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली.
 
 
या सर्व अडीअडचणींवर महापौर आणि आयुक्त यांच्यासोबत बैठक करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. बर्‍याच वर्षानंतर सभापती स्थायी समिती यांनी शिक्षण मंडळास भेट दिल्याने अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी समाधान व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@