सोहराबुद्दीन प्रकरण : सर्व २२ आरोपींची मुक्तता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 


मुंबई : साक्ष आणि पुराव्याआभावी १३ वर्षांपासून प्रलंबित सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बनावट चकमक झाल्याचे साक्ष आणि पुरव्यावरून सिद्ध होत नाही, असे सांगत मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने हत्येचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तब्बल १३ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे.

 

सीबीआयने यासंदर्भात केलेल्या तपासामध्ये तब्बल २१० साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या होत्या. मात्र समाधानकारक साक्ष आणि पुरावा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही प्रकारची हत्या झाली नसल्याचा निर्वाळा न्यायालायाने दिला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकार आणि यंत्रणांनी खूप मेहनत घेतली. मात्र तरीही कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. शर्मा यांनी हा निकाल दिला. "या प्रकरणात तीन लोकांना प्राण गमवावे लागले, त्याचे दु:ख आहे. मात्र कायदा आणि व्यवस्थेला कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची आवश्यकता असते." असे शर्मा यांनी निर्णय देताना स्पष्ट केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@