विज्ञान प्रदर्शनातूनच भावी शास्त्रज्ञाचा पाया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

जामनेर तालुकास्तरीय प्रदर्शनात दिलीप खोडपे यांचे प्रतिपादन

 
 
 
 
जामनेर  : 
 
विविध विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे कसब दिसते, यातूनच पुढे भावी शास्त्रज्ञ होण्याचा पाया मजबूत होण्यास मदत होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी केले. खोडपे येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत बोलत होते.
 
 
शहरातील पुरा भागातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या आवारात भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते झाले.
 
 
यावेळी माजी आ.दत्तात्रय महाजन, जिल्हा परिषद सभापती रजनी चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती रूपाली पाटील, उपसभापती सुरेश बोरसे, जिल्हा परीषद सदस्या प्रमिला पाटील, सुनंदा पाटील, रमन चौधरी, राजु पाटील, अण्णा पिठोडे, किशोर महाजन, मुख्याध्यापक व्ही. पी. पाटील, गटविकास अधिकारी अजय जोशी, गटशिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर, तालुकाभरातील शिक्षक, संबंधित विद्यार्थी मोठया संख्येने होते. उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या साहित्यांची आस्तेवाईकपणे पाहणी केली.
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिनाथ वाडकर यांनी केले तर सूत्रसंचालन अजय देशमुख यांनी केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@