रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यपदी संगीता वाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |


रावेर :
 
येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यपदी संगीता शिरीष वाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गुरुवारी पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहंमद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलविण्यात आली होती.
 
 
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विजयकुमार ढगे होते. संगिता वाणी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी ढगे यांनी केली.
 
 
यावेळी नगरसेवक अ‍ॅड. सुरज प्रकाश चौधरी, प्रल्हाद महाजन, शारदाबाई चौधरी, पार्वताबाई शिंदे, राजेंद्र महाजन, संगीता अग्रवाल, संगीता महाजन, यशवंत दलाल, असदुल्ला खा, पठान हमिदावी अयूब खा, ललिता बर्वे, आसिफ मोहंमद दारा मोहंमद, शे.नुसरत यास्मिन कलीम, शे.सादिक अब्दुल नबी सुधीर पाटील,रंजना गजरे, जगदीश घेटे, प्रकाश अग्रवाल आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@