पंढरपूरला महाआरतीसाठी दोन हजार शिवसैनिक जाणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

शिवसेना बैठकीत माजी आ. चिमणराव पाटील यांची माहिती

 
 
पारोळा : 
 
 
शिवसेना सामान्यांच्या हितासाठी लढणारा पक्ष असून उभ्या महाराष्ट्राला पांडुरंगाच्या पंढरीत शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी येत्या 24 तारखेला शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे तसेच तालुक्यातील दोन हजार शिवसैनिक पंढरपूरला जाणार असल्याचेही माजी आ. चिमणराव पाटील यांनी कृउबाच्या सभागृहात आयोजित शिवसेनेच्या बैठकीत सांगितले.
 
 
पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले की, संघटना, पक्ष वाढीसाठी शिवसैनिक व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असते. शिवसेना ही शिवसैनिकांच्या पाठबळावर उभी असून तुमची ताकद पाठिशी असल्याने कितीही मोठ्या विरोधकाला नामोहरम करण्याची शक्ती शिवसेनेच्या नेतृत्वात आहे.
 
 
चिमणराव पाटलाचा पराभव म्हणजे देवाचे अस्तित्वच नाही, असे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मांदियाळी सोबत असल्याने पराभवाची भीती नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
 
या बैठकीला शिवसेनेचे जि.प.सदस्य रोहिदास पाटील, डॉ. हर्षल माने, माजी नगराधक्ष्य दयाराम मोरे, तालुकाप्रमुख प्रा.आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, कृउबास उपसभापती मधुकर पाटील, सचिव रमेश चौधरी, माजी नगरसेवक राजू कासार, आबा महाजन, सिद्धार्थ जावळे, राजू बागडे यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठ हजार शिवसैनिक जाणार : जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ
 
 
धरणगाव - जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव, एरंडोल-पारोळा, जळगाव शहर व चाळीसगाव या विधानसभा मतदारसंघाची बैठक घेण्यात आली. राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, सहसंपर्क आर.ओ. पाटील, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, चिमणराव पाटील उपस्थित होते. 23 तारखेला 8 ते 10 हजार शिवसैनिक पंढरपुराला रवाना होणार असल्याचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@