आता धावत्या रेल्वेमध्येही होणार शॉपिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |



मुंबई : खासगी विमान कंपन्यांमध्ये विविध उत्पादने विकली जातात. त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. हीच पद्धत आता रेल्वे प्रशासनही लागू करणार आहेत. काही निवडक एक्स्प्रेस गाड्यांमध्येही विविध सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी वस्तू, फिटनेससाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेता येणार आहे. नवीन वर्षापासून निवडक गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे असल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली. सुरुवातीला मुंबईहून सुटणाऱ्या दोन गाड्यांमध्ये ही सेवा पुरविण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी गाड्यांचा यामध्ये समावेश केला जाईल.

 

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने एका खासगी कंपनीला याचे कंत्राटही दिले आहे. ही कंपनी १६ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पुढील ५ वर्षांसाठी विविध वस्तू विकणार आहे. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा संबंधित कंपनीच उभारणार आहे. केवळ सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी वस्तू आणि फिटनेससाठी लागणाऱ्या वस्तूच विकण्याची परवानगी खासगी कंपनीला देण्यात आली आहे. खाद्यपदार्थ, सिगारेट, मद्य आदी वस्तू ही कंपनी विकू शकणार नाही. ५ वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले असून, कंपनीकडून ३.५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

 

सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेतच या वस्तू धावत्या रेल्वेमध्ये विकता येतील. त्यासाठी गणवेशात दोन व्यक्ती गाडीमध्ये असतील. प्रवासी डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या साह्यानेही या वस्तू विकत घेऊ शकतील. गाडी स्टेशनवरून सुटल्यावर काहीवेळाने कोणत्या वस्तू विकण्यासाठी उपलब्ध आहेत, याचा चार्ट प्रवाशांना उपलब्ध करून दिला जाईल. मग प्रवाशांनी ऑर्डर दिल्यावर संबंधित वस्तू त्याच्या आसनावर जाऊन त्याला दिली जाईल. वस्तू विकण्यासाठी मोठ्या आवाजात कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@