श्री दादाजी धुनिवाले महाराज यांचा वार्षिक उत्सव थाटात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
श्री सद्गुरू दादाजी धुनिवाले महाराज यांच्या 84 व्या वार्षिक उत्सव श्री हरिहर नित्यसेवा मंडळ संचालित श्री दादाजी दरबार खेडी येथे गुरुवारी मोठ्या थाटात झाला. उत्सावानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले.
 
 
12 डिसेंबरपासून श्री दादाजी विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण व भागवत कथा सुरू करण्यात आली. 18 रोजी 24 तासांची अखंड नामधून करण्यात आली.
 
तसेच सकाळी 9 वा. पोलनपेठ, सिटी बसस्टॅण्ड मागील श्री दादाजी सत्संग झाल्यावर श्री दादाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
 
सुशोभित केलेल्या वाहनावर श्री दादाजी महाराज यांची प्रतिमा विराजमान करण्यात आली आहे. शोभायात्रेत मंगल कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत विविध भजनी मंडळे सहभागी झाली होती.शोभायात्रेच्या अग्रभागी ध्वजाधारी घोडेस्वार होता.
 
 
विविध कार्यक्रमांचे आयोजन
 
 
 
सकाळी काकडआरती, दुपारी 2.30 वा. भंडारा, 4 वा. नर्मदा मातेची आरती, सायं. 7 वा. महाआरती होऊन रात्री 9 वा. भजन झाले. श्री दादाजी परिवारातील परगावाहून आलेल्या भजन मंडळांनी आपापली भजने सादर केली.
 
 
 
यशस्वितेसाठी श्री दादाजी परिवारातील भक्तजनांनी परिश्रम घेतले, असे श्री हरिहर नित्य सेवा मंडळाचे बाजीराव पाटील, गुलाबराव पाटील यांनी कळविले आहे.
@@AUTHORINFO_V1@@