जिल्ह्यात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

चाळीसगाव नगरपालिकेसह धरणगावच्या सारजाबाई कुडे विद्यालयात प्रतिमा पूजन


 
 
चाळीसगाव : 
 
थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
 
गटनेते राजेंद्र चौधरी, आरोग्य सभापती सोमसिंग राजपूत, अभियंता राजेंद्र पाटील, ओ.एस. आनंद खैरनार, हिरामण खरात अभियंता विजय पाटील, डिंगबर वाघ, दीपक देशमुख, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आनंद खरात यांनी प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले.
 
 
गावोगावी, खेडेपाडे फिरून स्वच्छतेचे महत्त्व पटवून घरदार सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.
 
 
लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
 
 
ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली.
 
 
त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. ‘चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत असल्याचेही आनंद खरात यांनी सांगितले.प्रसंगी नागरपरिषदचे कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
 
 
धरणगाव सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालय
 
धरणगाव - येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शाळेतील उपशिक्षक स्वच्छतेचे पुजारी ए. एच. पाटील सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
 
 
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा.प्रा.रमेश महाजन, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा.एस.एस.पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य बा. पाटील, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दुपार सत्रात परमेश्वर रोकडे यांनी गाडगेबाबा यांच्या जीवनावर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पल्लवी मोरे यांनी मानले.
 
 
महात्मा फुले हायस्कूल
 
 
येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.एस.पवार यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक एस.एन. कोळी हे अध्यक्षस्थानी होते.
 
 
मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व्ही.टी.माळी यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे विचार त्यांचे सामाजिक कार्य विस्तृतपणे सांगितले.
 
 
एस.एन. कोळी यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आदर्श घ्या, स्वच्छता राखा व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या विचारांवर चालण्याचा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जे.एस. पवार तर आभार सी.एम. भोळे यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@