फुलगाव, कठोरासह चार गावांचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
वरणगाव : 
 
येथून जवळच असलेल्या फुलगाव, कठोरा बु, कठोरा खुर्द व अंजनसोंडे या चार गावांचा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केल्याने ठप्प झाला आह.े
 
वरणगावसह पाच गावांची पाणीपुरवठा असतानाचे वीजबिल थकीत असून या बिलामुळेच दर महिन्याला वीज मंडळ पुरवठा खंडित करते, ऊर्जामंत्री, आमदार, खासदार घोषणा करून सुद्धा मंडळाचे अधिकारी आपली मनमानी करतात. लोकप्रतिनिधींचे याबाबत काहीही वर्चस्व राहिलेले नाही. पाण्यासाठी महिला, वृद्ध, वणवण फिरत आहे.
 
पाणीपट्टी वर्षभराची भरून पाणी देण्यास शासन अयशस्वी ठरले आहे. यापूर्वी या गावांचा पाणीपुरवठा दहा दिवस ठप्प होता. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी बोलणी करून वीजपुरवठा सुरु केला होता.
 
परंतु पुन्हा मंडळाने विज खंडित केली आहे. वीज मंडळाचे अधिकारी लोकप्रतिनिधीचेही ऐकत नाही एवढे मुजोर अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधी व जनतेने जागा दाखविण्याची वेळ आल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. याबाबत संबंधितांनी दखल न घेतल्यास जनतेमध्ये उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@