मेहुणबारेला 25 रोजी जिल्हास्तरीय शिवार साहित्य संमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

प्राचार्य डॉ. तानसेन जगताप यांची पत्रकार परिषदेत माहिती

 
 
चाळीसगाव : 
 
महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावच्या वतीने मेहुणबारे येथे येत्या 25 डिसेंबर मंगळवार, रोजी जिल्हास्तरीय शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणे शाखा जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य डॉ.तानसेन जगताप यांनी येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
 
यावेळी शिवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र अमृतकार, शाखा उपाध्यक्ष प्रा. अशोक वाबळे कार्यकारी मंडळाचे सदस्य अशोक ब्राह्मणकर उपस्थित होते.
 
25 डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी साडेआठ वाजता या साहित्य संमेलनाचे उद्घाटन नाशिकचे कवी गीतकार प्रकाश होळकर यांच्या हस्ते तर संमेलनाध्यक्ष कवी उत्तम कोळगावकर (नाशिक) तसेच आ. उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, जिल्हा परिषद मोहिनी गायकवाड, मेहूनबारे लोकनियुक्त सरपंच श्रीमती संघमित्रा चव्हाण, कवी अशोक कोतवाल, प्रा. डॉ. पी. जे. जोशी प्राचार्य तानसेन जगताप यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 
 
खा. ए. टी. नाना पाटील यांच्या विशेष उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मेहूणबारे येथील राजेंद्र अमृतकर यांच्या मळ्यात भला मोठा सभा मंडप उभारण्यात आला असून त्याला कवी दु. आ. तिवारी साहित्य सभामंडप असे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य तानसेन जगताप यांनी दिली.
 
 
या कार्यक्रमाला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील राजपूत, विजय पाटील, ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, गणेश आढाव, अ‍ॅड. सुषमा पाटील, प्राचार्य पी. एस. चव्हाण, बी. एल. ठाकरे, अरुण भावसार, डॉ. विनोद कोतकर, प्रा. जयसिंग बागुल, सुभाष करवा, रामचंद्र गोसावी, रमेश पोतदार, शालिग्राम निकम संगीता देेव, प्रतिभा बागुल कवी मनोहर आंधळे, राकेश बोरसे, प्रा.तुषार चव्हाण, गौतम कुमार निकम यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा कार्यकर्ते संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणार आहेत.
 
दिवसभर असणार भरगच्च कार्यक्रम
 
 
या संमेलनात सकाळी अकरा वाजता शेती, शेतकरी, दुष्काळ व साहित्य या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्मल सीड्सचे डॉ. जे. सी. राजपूत परिसंवादाचे अध्यक्ष असतील तर प्राचार्य डॉ. सुदाम पाटील प्राचार्य कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर, लोहारा येथील कृषिरत्न विश्वासराव पाटील, कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांचा या परिसंवादामध्ये सहभाग असेल.
 
 
दुपारी साडेबारा वाजता हर्षल पाटील अभिनित नली हा परिवर्तननिर्मिती जळगावनिर्मित एकपात्री प्रयोग सादर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता अहिराणी बोली भाषेतील सादरीकरण शिंदखेडा तहसीलदार सुदाम महाजन यांच्या अध्यक्षेखाली होईल. डॉ. एस. के. पाटील, दाभाडी, शिरपूरचे आयतं पोयतं आख्यान फेम प्रवीण माळी यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे .
 
 
चार वाजता बहुभाषिक कवी संमेलन अमळनेरचे कवी रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व धरणगावचे कवी संजीव कुमार सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थित कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
 
सायंकाळी पाच वाजता या संमेलनाचा समारोप पाचोर्‍याचे आ. आर. ओ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी आ. राजीव देशमुख, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे, अशी माहिती यावेळी प्राचार्य तानसेन जगताप यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@