कर्तृत्ववान दिव्यांगांच्या ध्येयाचा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |


 

मुंबई : कर्तृत्ववान दिव्यांगांचा सन्मान केला जाणारा नूतन गुळगुळे, गुळगुळे फाऊंडेशन आयोजित ‘ध्येयपूर्ती पुरस्कार २०१८' हा कार्यक्रम शनिवार, दि. २२ डिसेंबर, २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे होणार आहे. रा. स्व. संघ सरसंघचालक मोहनजी भागवत अध्यक्षतेखाली व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

 

जन्मतः किंवा अपघाताने आलेल्या अपंगत्वावर मात करून जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या दिव्यांगांच्या सन्मान हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याची माहीती संस्थेच्या पुष्कर गुळगुळे यांनी दिली. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, बॉम्बे इंटेलिजेंस सिक्योरिटी (इंडिया) लि.चे अध्यक्ष आर. एन. सिंह आणि ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@