तांबापूरमधील समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |


विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 
जळगाव : 
 
तांबापूरमध्ये 2 दिवसांपूर्वीच पोलीस कर्मचार्‍याच्या लग्नाच्या वरातीवर दगडफेक करणार्‍या समाजकंटकांवर संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, शहर तणावमुक्त करण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. उपजिल्हाधिकारी भारदे यांना 20 रोजी हे निवेदन देण्यात आले.
 
महानगर सहमंत्री दीपक दाभाडे, सहमंत्री देवेंद्र भावसार, श्रीराम बारी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राकेश लोहार, महानगर सहमंत्री दाभाडे, हर्षद झाल्टे, महानगर संयोजक राजेंद्र नन्नवरे, सहसंयोजक समधान पाटील, डॉ.हितेंद्र गायकवाड, शैलेश ठाकूर, विशाल जगदाळे आदी कायकर्ते उपस्थित होते.
 
 
दगडफेकीतील जखमी तरुणाचा मृत्यू होऊन त्याचा परिवार कमालीचा उद्ध्वस्त झालेला आहे. समाजकंटकांचे उपद्व्याप न थांबल्यास त्याचा भीषण उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@