पुण्यातून काँग्रेस निवडणूक लढवणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |



मुंबई : पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेस निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस ने ही जागा त्यांच्यासाठी सोडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ही जागा काँग्रेसला देण्यात आली. पुणे लोकसभेची जागा पवार यांनी लढवण्याची इच्छा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. परंतु त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता ही जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपच्या अनिल शिरोळे यांचा विजय झाला होता. त्यावेळीही काँग्रेसने या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. पुण्याच्या जागेचा तिढा सुटला अला तरी अन्य जागांसाठी मतभेद कायम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान दोन्ही पक्ष ५०-५० चा फॉर्मुल्यावर कायम आहेत. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय हा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@