बॅंक अधिकाऱ्यांच्या संपामुळे ग्राहकांचे हाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |
 
 
 

मुंबई : देशातील मोठ्या सार्वजनिक बॅंकांच्या विलीनीकरण विरोध यांसह प्रलंबित वेतन वाढीची मागणी करत शुक्रवारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सार्वजनिक बॅंकांचे कामकाज ठप्प झाले. या संपात सुमारे तीन लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याचा दावा संघटनांनी केला. संपामुळे एसबीआय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, देना बॅंक यासारख्या बॅंकांमध्ये शुकशुकाट दिसत होता. आजच्या संपामुळे मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या ग्राहकांना बॅंकिंग व्यवहारांसाठी आता थेट पुढल्या आठवड्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 

सार्वजनिक बॅंकांमध्ये नोव्हेंबर २०१७ पासून वेतन करार प्रलंबित आहे. त्यातच सरकारकडून बॅंकांच्या विलीनीकरणाचा धडाका लावला आहे. "एसबीआय"च्या विलीनीकरणानंतर केंद्राकडून विजया, देना आणि बॅंक ऑफ बडोदा या बॅंकांचे विलीनीकरण प्रस्तावित आहे. याला कर्मचारी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. आजच्या संपात ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बॅंक वर्कस आदी संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते. सार्वजनिक बॅंकांमधील नऊ संघाटनांची प्रतिनिधी संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सकडून २६ डिसेंबर रोजी संपाची हाक दिली आहे. मंगळवारी (ता.२५) नाताळ निमित्त सार्वजनिक सुट्टी असून बुधवारी (ता.२६) संपामुळे पुढील आठवड्यात सलगदोन दिवस ग्राहकांना बॅंकिंग व्यवहार करता येणार नाहीत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@