जिल्हास्तरीय युवक महोत्सवाच्या तारखेत बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
 
 
यापूर्वी जाहीर झालेल्या युवक महोत्सवाच्या काळात विधि व शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा येत असल्यामुळे नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
 
एरंडोल विभागाचा महोत्सव 5 जानेवारीऐवजी 28 जानेवारी रोजी बी.पी.कला, एस.एम.ए. विज्ञान व केकेसी वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव येथे होणार आहे. जळगाव विभागाचा 7 जानेवारी रोजी जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, शिरसोली रोड, जळगाव येथे होणारा महोत्सव आता 1 फेब्रुवारी रोजी याच ठिकाणी होईल.
 
 
कुसुंबा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात धुळे जिल्ह्याचा 9 जाने. रोजी होणारा महोत्सव आता 4 फेब्रुवारीला होणार आहे. तर तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे नंदुरबार जिल्हयाचा 11 जाने. रोजी होणारा युवक महोत्सव आता 6 फेब्रु.ला होणार आहे.
 
 
या जिल्हास्तरीय युवक महोत्सवातील कला प्रकारनिहाय प्रथम, द्वितीय पारितोषिके प्राप्त महाविद्यालयांचा विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव फेब्रुवारीत विद्यापीठात होणार आहे.
 
 
या महोत्सवाच्या तारखा लवकरच जाहीर होतील, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.एस.टी.इंगळे यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@