भुसावळ आयुध निर्माणीची आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

आयुध शक्तीस्थळाचे लोकार्पणप्रसंगी पी. के. श्रीवास्तव यांचे प्रतिपादन

 
 
भुसावळ : 
 
 
भुसावळ आयुध निर्माणी रक्षा उत्पादनांच्या पॅकेजिंग बनविण्यासाठी ओळखली जाते. विविध प्रकारच्या युद्ध उपकरणाचे पॅकेजिंग बॉक्स येथे बनविले जातात.
 
त्याचबरोबर आयुध निर्माणी आधुनिकीकरण व स्वचलन (आटोमेशन)कडे वेगाने वाटचाल करीत आहे. भुसावळचे अधिकारी व कर्मचारी एकजुटीने आपल्या मेहनत व हिमतीवर विकासात हातभार लावतील व आपली प्रतिमा टिकवून ठेवतील, असा विश्वास कोलकाता आयुध निर्माणी बोर्डाचे महानिर्देशक तथा अध्यक्ष पी. के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
 
 
इस्टेटमधील आयुध शक्ती स्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आयुध शक्ती स्थळाच्या ठिकाणी भुसावळ फॅक्टरीतील प्रमुख व महत्त्वपूर्ण उत्पादन पिनाका पॉड असेंम्ब्लीचे प्रतिरूप स्थापन करण्यात आले. ज्याद्वारे सर्वसामान्य जनतेचा सामरिक महत्त्व समजून पिनाका पॉड असेंम्ब्लीची माहिती होईल.
 
 
प्रसंगी महिला कल्याण समिती (आयुधी) च्या अध्यक्षा सीमा श्रीवास्तव, बोर्डच्या अध्यक्षा (आयुधी) डॉ. वनिता पुरी, प्रभारी अधिकारी एस. पी. पाटील, अप्पर महाप्रबंधक सुधीर मलिक, वरिष्ठ अधिकारी, कार्यसमितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@